sambhajinagar book festival
sakal
सरस्वती भुवन मैदान (औरंगपुरा) - विविध प्रकाशन संस्थांचे स्टॉल. टेबलावर, रॅकमध्ये ठेवलेली असंख्य पुस्तके. या स्टॉलवरून त्या स्टॉलवर पुस्तके पाहत फिरणारी चिमुकली पावले. डोळ्यांत चमक. मनात उत्सुकता. मुख्यपृष्ठांची भुरळ. ‘अरे, हे पुस्तक बघाऽऽ’ असे सूचवणारे शिक्षक. त्यांना प्रश्न विचारणारे विद्यार्थी आणि त्यांचा किलबिलाट.
अशा वातावरणात ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवाचा तिसरा दिवस (सोमवार ता. १९) वाचन संस्कृतीचा उत्सव ठरला. सकाळी दहापासूनच शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी महोत्सव परिसर गजबजून गेला. पहिल्या दोन दिवसांत देश-विदेशातील पुस्तकांना भरघोस प्रतिसाद मिळाला.