dasu vaidya
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘सकाळ’ पुस्तक महोत्सव गर्दीने गजबजले आहे. लहान मुले मोठ्या उत्सुकतेने पुस्तके न्याहाळत आहेत. तरुणाईची पावले ग्रंथनगरीत रेंगाळत आहेत. अशा वातावरणात प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी ‘पुस्तकं काही सांगू इच्छितात... तुमच्या सावलीत रांगू इच्छितात...’ ही पुस्तकांची गोष्ट आपल्या कवितेतून मांडली. शिवाय पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले.