Administration Reacts: Water Tanker Arrives in Brahmangaon: ब्राह्मणगाव, आडूळ तांडा आणि बुद्रकमध्ये भीषण पाणीटंचाई नंतर प्रशासनाने टँकर सुरू केला. महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पिण्याचे पाणी मिळाले.
आडूळ: पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव तांडा, आडूळ तांडा व आडूळ बुद्रक येथे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचे वास्तव दैनिक ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे.