Chhatrapati Sambhajinagar: ब्राह्मणगाव तांड्यात पाणीटंचाई; महिलांना व मुलांना हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट; विहिरी व बोअर कोरड्या पडल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

Severe Water Shortage in Brahmangaon Tanda: पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव तांड्यात पाणीटंचाई; महिलांना व चिमुकल्यांना हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागते.विहिरी व बोअर कोरड्या, प्रशासनाच्या उपाययोजनांवर नाराजी. गावातील नागरिक तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी करत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: आता आमचं वय झालंय... आम्ही चालायचं कसं अन् पाणी शोधायचं कुठं... विकत पाणी घ्यायचं म्हटलं, तर एका ड्रमसाठी ७० रुपये मोजावे लागताय... ते पैसे आणायचे कुठून... अशी व्यथा ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या राधाबाई यांनी मांडत पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव तांडा येथील पाणीटंचाईच्या भयंकर वास्तव्यावर बोट ठेवले. ब्राह्मणगाव तांडा येथील ग्रामस्थांचे जनजीवन या पाणीटंचाईमुळे विस्कळित झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांनाही रोज दोन ते तीन किलोमीटरवर पायपीट करावी लागत आहे. तळपत्या उन्हात केवळ दोन घागरी पाण्यासाठी सुरू असलेली ही जीवघेणी धडपड पाहून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com