esakal | औरंगाबादेत एआरटीओ सह खाजगी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

ribe in Aurangabad

औरंगाबादेत एआरटीओ सह खाजगी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: आरटीओ कार्यालायात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (ता. बारा) छापा टाकला. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह त्यांच्या सहाय्यकाला आठ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या आरटीओ कार्यालयात छापा पडल्यानंतर खळबळ उडाली आहे. शहरातील एका ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

स्कूलच्या उमेदवारांच्या टेस्टनंतर दिला जाणारा राहिलेला आठ हजार रुपयांचा मोबदला देण्यासाठी अधिकारी अडून बसलेले होते. त्यामुळे मोटार ड्रायव्हिंगच्या संचालकाने थेट मुंबईच्या कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी दुपारी सापळा लावला होता. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा खाजगी सहाय्यक अभिजीत पवार याला रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

हेही वाचा: चांगली बातमी! अखेर पोलिस भरतीची प्रतिक्षा संपली

त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने व अभिजीत पवार या दोघांना पथकाने टाटा सुमो (क्र.एम. एच ०१ डी. बी. १३८७) या वाहनातून वेदांतनगर पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशीरापर्यंत चौकशी करण्यात येत होती.

loading image