Chh. Sambhajinagar : लेकीच्या लग्नाच्या दिवशीच पित्याचा मृत्यू; वऱ्हाडींवर अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची वेळ

वऱ्हाडही निघालं. पण, आपल्या लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापूर्वीच सकाळी घायतिलक यांचा आकस्मिक मृत्यू
bride father dies on marriage day chhatrapati sambhajinagar
bride father dies on marriage day chhatrapati sambhajinagarSakal
Updated on

कन्नड : ज्या लेकीला लहानाचे मोठे केले. तिचा विवाह होता. घरात आनंदाचे वातावरण होतो. मागील दोन महिन्यांपासून बापाची धावपळ सुरू होती. लेकीचा लग्नाचा दिवस आला. पण, नियतीच्या मनात दुसरेच काही शिजत होते.

लग्नाच्या दिवशीच वधूपित्याचा आकस्मिक मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शहरातील निसर्ग सिटी येथे सोमवारी (ता. २०) सकाळी घडली. राजू काशिनाथ घायतिलक (वय ५१) असे मृताचे नाव आहे. शिक्षक असलेल्या घायतिलक यांची मुलगी प्रतीक्षा हिचा सोमवारी विवाह होता. सगळी तयारी झाली होती. दारात मांडव टाकला होता.

पाहुणे, मित्र, आप्तेष्ट रात्रीपासूनच येत होते. वऱ्हाडही निघालं. पण, आपल्या लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापूर्वीच सकाळी घायतिलक यांचा आकस्मिक मृत्यू झाला. आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. वरातीत सहभागी होण्यास जे आले होते त्यांच्यावर अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची वेळ आली. हा प्रसंग हृदयद्रावक पाहून उपस्थित सगळ्यांचे डोळे पाणावले.

दुपारी लागले लग्न

प्रतीक्षा हिचा विवाह डीडीएल लॉन्स येथे दुपारी साडेबारा वाजता ठरलेला होता. सर्व पाहुणे त्यासाठी जमलेले होते. पित्याचे निधन झाल्याने शोककळा पसरली. शोकाकूल वातावरणात हिवरखेडा रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजता मुलीचा विवाह लावण्यात आला. राजू घायतिलक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com