छत्रपती संभाजीनगर - लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए. सिन्हा यांनी गुरुवारी (ता. आठ) जन्मठेप आणि विविध कलमांखाली ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सौरभ बंडू लाखे (३१, रा. शिऊर ता. वैजापूर) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. इतर दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.