
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून टाऊन हॉल भागात दोन तरुणांवर रविवारी (ता. तीन) चाकूने हल्ला करण्यात आला. त्यातील एका तरुणाच्या जबड्यात चाकू खुपसण्यात आला, त्याला घाटी रुग्णालयात आणल्यानंतर पोलिस एमएलसी प्रक्रिया आणि डॉक्टरांची उपलब्धता करण्यात तब्बल पाच तास गेले. या वेळेत तरुणाच्या जबड्यात चाकू अडकून त्याच अवस्थेत होता! रात्री पावणेदोनच्या सुमारास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी चाकू काढून तरुणाची सुटका केली.