
औरंगाबाद : अर्थसंकल्प ‘बुस्टर डोस’ ठरेल ; डॉ. भागवत कराड
औरंगाबाद : कोरोना संकटानंतर हळूहळू का होईना पूर्वपदावर येत असलेली अर्थव्यवस्था पाहता यंदाचे बजेट कसे असेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्यसभेवर नियुक्ती आणि वर्षभरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री झालेले डॉ. भागवत कराड यांचा त्या खात्याचे मंत्री म्हणून हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्याआधीच तो ‘बुस्टर डोस’, असेल असे संकेत कराड यांनी दिले आहेत. (Union Budget 2022 Live Updates)
हेही वाचा: Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt
आपल्या फेसबूक पेजवरून यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल त्यांनी थोडक्यात आणि नेमके भाष्य केले. स्वातंत्र्यानंतर औरंगाबादला केंद्रात महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. केंद्रात सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालन्याला राज्यमंत्रीपदे मिळाली आहेत. कराड यांच्याकडे अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून तर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे.
हेही वाचा: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश
केंद्रातील यंदाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत सादर करण्याची संधी डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री म्हणून मिळणार आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून या बजेटकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी कराड यांनी यंदाचे बजेट कसे असेल याची थोडक्यात कल्पना फेसबूकच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था सावरली असून पुढील वर्ष हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे वर्ष ठरणार असल्याचा दावा कराड यांनी केला आहे. देशाच्या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प नक्कीच बुस्टर डोस ठरेल, अशी अपेक्षाही श्री. कराड यांनी व्यक्त केली.
Web Title: Budget Will Be Booster Dose Dr Bhagwat Karad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..