नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

नवी दिल्ली : समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणी केंद्रीय अनुसुचीत जाती आयोगानं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तसेच ही तर आता सुरुवात आहे, अशा शब्दात त्यांनी मलिक यांना आव्हानही दिलं. (file FIR against Nawab Malik order by SC commission says Mohit Kamboj)

कंबोज म्हणाले, नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत जी तक्रार केली होती. त्यावर आज राष्ट्रीय अनुसुचीत जाती आयोगानं मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत की, पुढील सात दिवसात नावाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे. आयोगाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. पण आता हा अजामीनपात्र गुन्हा असल्यानं मुंबई पोलीस नवाब मलिकांविरोधात केव्हा गुन्हा दाखल करतात आणि अटक करतात याची संपूर्ण देश वाट पाहतोय.

Web Title: File Fir Against Nawab Malik Order By Sc Commission Says Mohit Kamboj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top