ST Bus Accident on Dhod–Chhatrapati Sambhajinagar Road

ST Bus Accident on Dhod–Chhatrapati Sambhajinagar Road

esakal

Bus Accident : बसखाली चिरडून तीन मित्रांचा दुर्दैवी अंत; डोक्याची कवटी फुटून मेंदूचा झाला चेंदामेंदा, छत्रपती संभाजीनगर-धाड मार्गावर दुर्घटना

Fatal ST Bus Accident on Dhod–Chhatrapati Sambhajinagar Road : धाड येथे करडी पुलावर एसटी बसखाली चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी धाड–छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडला.
Published on

Dhod Chhatrapati Sambhajinagar Road Accident : छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली (ST Bus Accident) चिरडल्या गेल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुर्दैवी घटना सोमवारी (ता. ५) रोजी सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी धाड- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील करडीच्या (धाड) पुलावर घडली. अपघात इतका भयंकर होता की, यातील एकाच्या डोक्याची कवटी फुटून त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com