

Municipal action on Matin Patel property
Esakal
Bulldozer Action on Matin Patel Property Sparks Debate छत्रपती संभाजीनगर, ता. 13 -नाशिक येथील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणारे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अधिकृत मालमत्तांवर महापालिकेने अखेर टाच आणली आहे. नारेगाव परिसरातील दोन घरे, कार्यालयावर जेसीबी चालविण्यात आले. कारवाईसाठी आलेल्या पथकाचे एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फुले उधळून स्वागत केले. पटेल यांच्या सहा वर्षाच्या मुलीने अधिकाऱ्याला घटनेची प्रत देऊन अशाच प्रकारची कारवाई सर्वत्र करावी, असे आवाहन केले.