
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यातील दरोडाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. दहा) नांदेड येथून आणखी दोघांना अटक केली. यात रूपेश सुभाष पत्रे (२५) हा अमोल खोतकरचा मित्र आहे, तर वैभव श्रीपाद मैड (२३, दोघेही रा. नांदेड) हा नांदेड येथील सराफा व्यापारी आहे.