Bus Accident : चालकाचा ताबा सुटून बस २० फूट खड्ड्यात ...जाफराबादजवळ १२ प्रवासी जखमी
Chikhali-Jafrabad : चिखली-जाफराबाद मार्गावर कोळेगावजवळ बसचा चालकाचा ताबा सुटून बस २० फूट खोल खड्ड्यात उलटली. अपघातात १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जाफराबाद : चिखली-जाफराबाद मार्गावरील कोळेगावजवळ चालकाचा ताबा सुटल्याने बस (एमएच १४, बीटी ०६४७) २० फूट खोल खड्ड्यात उलटली. हा अपघात मंगळवारी (ता. २४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झाला.