Social Media Fraud : फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्टमुळे एका व्यापाऱ्याने ५४ लाख ७० हजार रुपये गमावले. महिला व्यापाऱ्याला ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवायला लावून फसवणूक केली असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा : फेसबुकवर एका महिलेची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. व्यापाऱ्याने ती हातोहात स्वीकारली. मग तिने ट्रेडिंग करून नफ्याचे आमिष दाखविले. याला बळी पडून व्यापारी ५४ लाख ७० हजार रुपये गमावून बसला.