म्हैसमाळ येथे सी डॉप्लर रडारची होणार उभारणी, मराठवाड्याला होणार फायदा

मराठवाड्यातील ७२ लाख शेतकऱ्यांना आता हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे.
doppler radar
doppler radar
Updated on

खुलताबाद (जि.औरंगाबाद ) : म्हैसमाळ (ता.खुलताबाद) येथे लवकरच सी-बॅंड डॉप्लर रडारची लवकरच उभारणी केली जाणार आहे. यामुळे मराठवाड्यातील ७२ लाख शेतकऱ्यांना आता हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे. यावर १०० कोटी खर्च होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी गुरुवारी (ता.२१) खुलताबाद (Khultabad) येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डॉ.कराड यांनी सांगितले की, मराठवाड्यासारख्या मागासलेल्या प्रदेशात शेतकरी कायम चिंतेत राहत असे ते हवामानामुळे, मराठवाड्यात (Marathwada) असलेल्या परभणी येथील कृषि विद्यापीठाला देखील मुंबई येथील वेध शाळेवर अवलंबून रहावे लागत असते. याचा सारासार विचार करता गेल्या महिन्यापासून आपण पृथ्वी व हवामान मंत्रालयाचे मंत्री जितेंद्रसिंह यांच्याकडे पाठपुरावा केला. (C Doppler Will Be Install At Mhaismal Of Aurnagabad)

doppler radar
औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून, निर्दयी घटनेचा व्हिडिओ आला समोर

त्या अन्वये या मंत्रालयाचे सचिव डॉ.एच.रवींद्र चंद्रन यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सी.बॅंड डॉप्लर रडार यंत्रणा बसविण्यास मंजुरी दिली. खुलताबादपासून जवळच असलेल्या म्हैसमाळ येथे सदरील यंत्रणा बसविण्याबाबत अंतिम झाले असुन, या बाबतची जागेची पाहणी भारतीय हवान खात्याचे शास्त्रज्ञ रोहित शुक्ला व अभिषेक जाधव यांनी गुरुवारी (ता.२१) म्हैसमाळ येथे जावून जागेची पाहणी केली.

doppler radar
नांदेडमध्ये हळदीच्या कुकरचा स्फोट, १ ठार अन् ३ गंभीर जखमी

तालुक्यातील म्हैसमाळ येथे बसविण्यात येणाऱ्या सी बॅंड कलर डॉप्लर यंत्रणेमुळे भविष्यात जवळपास ३०० कि.मी.अंतरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचुक अंदाज मिळणार आहे. ढगफुटी, अतिवृष्टी तसेच आगामी काळातील पर्जन्यमान कळणार आहे. देशात अशा प्रकारच्या ३३ सी बॅंड डॉप्लर रडार यंत्रणा कार्यान्वित असुन नव्याने ११ रडार बसविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com