नांदेडमध्ये हळदीच्या कुकरचा स्फोट, १ ठार अन् ३ गंभीर जखमी | Nanded Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

नांदेडमध्ये हळदीच्या कुकरचा स्फोट, १ ठार अन् ३ गंभीर जखमी

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. हळदीच्या कुकरचा स्फोट झाल्याने एका तरुण शेतकरी ठार झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील गुंडोपंत दापका येथे ही घटना घडली आहे. सुनिल मारकवाड (वय २८) असे ठार झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. (Young Farmer Died In Turmeric Cooker Explosion, Three Serious Injured In Nanded)

हेही वाचा: औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून, निर्दयी घटनेचा व्हिडिओ आला समोर

अनिता दापकेकर, ओम दापकेकर, बळीराम बाऱ्हाळी असे स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उदगीर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: 'सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा...'

गुंडोपंत दापका येथे हळद शिजवत असताना कुकरमधून पाणी बाहेर येते होते. ते कशामळे होत आहे. त्यासाठी वाॅल तपास असताना स्फोट झाला. यात कुकर फुटून दूरवर फेकले गेले.

Web Title: Young Farmer Died In Turmeric Cooker Explosion Three Serious Injured In Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedMukhedexplosion
go to top