
छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर परिसरातील न्यू शांतीनिकेतन कॉलनीत बुधवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय ओम संजय राठोड या तरुणाने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवून आत्महत्या केली. या स्फोटामुळे घराचेही मोठे नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.