esakal | औरंगाबाद - नगर रोडवर धावत्या कारला आग ; आगीत कार जळून खाक

बोलून बातमी शोधा

burning car
औरंगाबाद - नगर रोडवर धावत्या कारला आग ; आगीत कार जळून खाक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद: औरंगाबाद नगर रोडवरील तिसगाव फाट्याजवळ असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला एका सीएनजी पेट्रोल कारला सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत कार (MH 20 BY 3307) पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान या घटनेमुळे वाळूजकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सदरील चारचाकी वाहनात दोन माणसे व दोन महिला होत्या. वाहनाने पेट घेतल्यानंतर चालकांनी सावधानता बाळगत सर्वाना कारच्या खाली उतरवले. त्यामुळे या सर्वांचा जीव वाचला. डॉक्टर दिपाली मोरे यांच्या वडिलांची अस्ती कायगाव येथे विसर्जित करण्यासाठी कारमध्ये हे चौघेजण चालले होते. मात्र सीएनजी असल्याने कारने रेल्वे उड्डाणपुलाजवळ पेट घेतला. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कार जळून खाक झाली आहे.

हेही वाचा: मामाला भेटायला गेलेली आई माघारी आलीच नाही, ८ वर्षीय चिमुरड्याची मन सुन्न करणारी कहाणी

दरम्यान या अपघाताची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ड्युटी इन्चार्ज एल. पी. कोल्हे, विनायक लिमकर, संग्राम मोरे, अक्षय नागरे, परमेश्वर साळुंके, शुभम आहेरकर, राम सोनवणे, सुभाष दुधे यांनी पुढाकार घेतला.