esakal | मामाला भेटायला गेलेली आई माघारी आलीच नाही... ८ वर्षीय चिमुरड्याची मन सुन्न करणारी कहाणी

बोलून बातमी शोधा

aurangabad
मामाला भेटायला गेलेली आई माघारी आलीच नाही, ८ वर्षीय चिमुरड्याची मन सुन्न करणारी कहाणी
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: भरधाव फोर्ड कंपनीच्या जीपने दाम्पत्याला उडवल्याची घटना हडको  एन- 12 परिसरात गुरुवारी (ता.29) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. 

मयूरनगर भागातील पाटणी रेसिडेन्सी येथील प्रकाश शेळके आणि त्यांच्या पत्नी हे आपल्या ऍक्टीव्हा दुचाकीने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घराकडे जाताना अपघात झाला होता. अपघातानंतर गंभीर जखमी दाम्पत्याला नागरिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला तर प्रकाश शेळके हे गंभीर आहेत.

हेही वाचा: 'हाताला काम नाहीतर सरसकट मदत तरी द्या'

या दाम्पत्याला आठ वर्षांच्या मुलगा आहे. मामाकडे गेलेले आई-बाबा अजून कसे घरी आले नाहीत असा प्रश्न तो करत आहे. गुरुवारची रात्रीने त्या चिमुरड्याची आई हिरावून घेतली आहे तर वडील गंभीर आहे. या अपघाताने आठ वर्षांच्या चिमुकल्याला एका क्षणात पोरकं करून टाकले आहे.

हडको एन-12 येथील एसपीआय चौकात रस्ता ओलांडताना त्यांच्या ऍक्टिव्हाला फोर्ड कंपनीच्या जीपने जोरदार धडक दिली होती. जीपने ऍक्टीव्हावर असलेल्या शेळके दाम्पत्याला तब्बल 10 ते 12 फूट फरफटत नेले होते. अपघातानंतर या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला.

हेही वाचा: आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!

नागरिकांनी जखमी शेळके दाम्पत्याला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. अपघातावेळी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. यावेळी सिडको व सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला होता.