भरधाव कारची दुचाकीला धडक

भरधाव कारची दुचाकीला धडक
Published on: 
भरधाव कारची दुचाकीला धडक छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोलनाक्याजवळ एका भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, अपघातानंतर जखमीला मदत न करता कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसीर खान कदीरखान (३८, रा. रहीमनगर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून, त्यांचे साजापूर चौफुली येथे एनके ऑटो गॅरेज आहे. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते करोडी टोलनाक्याजवळील मुस्तकीम यांच्या गॅरेजवर युरियाची बकेट आणण्यासाठी गेले होते. मात्र, बकेट उपलब्ध नसल्याने ते आपल्या इलेक्ट्रिक स्कूटीने (क्र. एमएच २०, एचयू ०३७६) साजापूरकडे परतत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुस्तकीम यांच्या गॅरेजसमोर मागून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कूटीला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. या धडकेत नसीर खान रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापू डोंबाळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.