कुणबी, मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रशासन सरसावले; महसूल मंडळांत विशेष शिबिरे:

कुणबी, मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रशासन सरसावले; महसूल मंडळांत विशेष शिबिरे:
Published on
कुणबी प्रमाणपत्रासाठी ११, १६ ला विशेष शिबिर कळंब, ता. १० (बातमीदार) : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी तालुका प्रशासनाने महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. कळंब तालुक्यातील आठ महसूल मंडळांत ११ आणि १६ सप्टेंबर रोजी ही शिबिरे घेण्यात येणार आहेत. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या निर्देशानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महसूल अभिलेख, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग तसेच सेवा पुस्तकांमधील अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील १३८ गावांत ५ हजार ३६४ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यापैकी कळंब तालुक्यात ६५० कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींच्या तालुकानिहाय याद्या तसेच संबंधित अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयांतही या याद्या नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जुन्या अभिलेखांमध्ये कुणबी नोंद आढळलेल्या पात्र नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि जात प्रमाणपत्रासाठी वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रक्रिया वेगवान केली आहे. अडचणींसाठी ४७ नोडल अधिकारी कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि संबंधित बाबींमध्ये नागरिकांना सहाय्य मिळावे, यासाठी तालुक्यातील आठ महसूल मंडळ स्तरावर महसूल मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी आदी ४७ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com