
संभाजीनगर शहरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. नामांकित बिल्डरच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. हा प्रकार शहरातील एन ४, सिडको भागात रात्री ९ वाजता घडला. सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला असून, या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.