
छत्रपती संभाजीनगर : अंकाई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतलेला असतानाच गुरुवारी (ता. ३१) छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या मार्गामुळे रेल्वे प्रवासी आणि माल वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.