
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उन्हाळी परीक्षेचा बीपीएड आणि एमपीएडचा निकाल सोमवारी (ता. नऊ) जाहीर केला. आतापर्यंत एकूण ११ विषयांचे निकाल जाहीर झाले. तसेच विधी तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या रिड्रेसलचे निकालही जाहीर करण्यात आले. तर ‘स्पेलिंग मिस्टेक’ झालेली प्रमाणपत्रे पदवी प्रदान कक्षात पुढील दहा दिवसांत जमा करण्याच्या सूचना महाविद्यालयांना परीक्षा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.