छत्रपती संभाजीनगर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी दस्तऐवज पडताळणी तसेच सुविधा केंद्रे (स्क्रुटणी सेंटर-एससी) नियुक्त केली जाणार आहेत. .त्यासाठी पात्र व इच्छुक महाविद्यालयांकडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयांना नोंदणीसाठी २४ जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे..राज्यातील शासकीय, शासन अनुदानित व विद्यापीठ संचालित महाविद्यालयांसाठी ही नोंदणी अनिवार्य असून, इच्छुक संस्थांनी https://fcreg2025.mahacet.org/ या पोर्टलवर जाऊन १९ ते २४ जून २०२५ या कालावधीत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे. नोंदणी करताना महाविद्यालयांनी पोर्टलवर दिलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण असल्याची खातरजमा करणे बंधनकारक आहे..Chh. Sambhaji Nagar News : बदली अर्जात शिक्षकांचे आजार, कौटुंबिक अडचणी ठरल्या प्रमुख कारणे.अर्ज स्वीकारल्यानंतर केवळ पात्र आणि सुसज्ज संस्था निवडण्यात येणार असून, निवड झालेल्या संस्थांना नियमानुसार दस्तऐवज पडताळणी व विद्यार्थ्यांना सेवा पुरविण्याचे कार्य पार पाडावे लागणार आहे. राज्यातील शासकीय, शासन अनुदानित व विद्यापीठ संचालित महाविद्यालयांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेशप्रक्रिया आणि दस्तऐवज पडताळणीसाठी ही केंद्रे उपयुक्त आहेत..सूचना व जबाबदाऱ्यानोंदणीकृत संस्थांमधूनच स्क्रुटणी सेंटर निवड केली जाणारविद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शनआणि सेवा देणे बंधनकारकनियमानुसार काम न केल्यास संबंधित संस्थांवरकार्यवाही करण्यात येईलमार्गदर्शक सूचना सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.