

Latest Maharasthra News : लग्नासाठी दिलेले तीन लाख रुपये व अंगावरील दागिने घेऊन मामाच्या दुचाकीवरून ‘दुल्हन’ फरार झाल्याची घटना वाळूज परिसरात सोमवारी (ता. २१) उघडकीस आली. याप्रकरणी तिच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः कुबेर गेवराई (छत्रपती संभाजीनगर) येथील हरिचंद्र अशोक कुबेर (वय ३३) हा लग्नासाठी वधू शोधत असताना मुळे (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी हरिचंद्र कुबेर यांचे चुलते पांडुरंग कुबेर यांना स्थळ असल्याचे सांगितले. जोगेश्वरी येथे २६ मार्च २०२४ रोजी नातेवाइकांच्या उपस्थितीत मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला.