Kidnapping Case sakal
छत्रपती संभाजीनगर
Kidnapping Case : चैतन्य तुपे याचे अपहरण करणाऱ्यांचे रॅकेट; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता, बिहारी कनेक्शन पोलिसांची माहिती
Chaitanya Tuppe Abduction Case : चैतन्य तुपेच्या अपहरणप्रकरणी आरोपी एक मोठे रॅकेट चालवत होते, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. बिहारमधील एक कामगार त्यांच्या संपर्कात होता. तपासाच्या पुढील टप्प्यात अधिक आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
अदालत रोड : चैतन्य सुनील तुपे (वय ७) याचे अपहरण करणारे आरोपी हे रॅकेट चालवित असून, एक बिहारी कामगार त्यांच्या संपर्कात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात पोलिस तपासानंतर आणखी कलम वाढवले जाण्याची शक्यता असून, आरोपीही वाढणार आहेत.