Panchayat Samiti Election 2026 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १२४ विविध योजनांची अमलबजावणी करणार : चंद्रशेखर बावणकुळे

Chandrashekhar Bawankule speech : उमरगा-लोहारा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपसह मित्र पक्ष उमेदवारांचे प्रचार मोहीम जोरात. १२४ विकास योजनांसाठी निधी उपलब्ध, महिला कल्याण, पायाभूत सुविधा, रस्ते, शेतकऱ्यांसाठी योजना अमलात आणण्याचे आश्वासन.
Panchayat Samiti Election 2026

Panchayat Samiti Election 2026

esakal

Updated on

उमरगा : ग्रामीण भागाच्या विविध विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन १२४ विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी होणार आहे. 'कमळा' चे बटन १२४ योजनांवर काम करणार असल्याने मतदारांनी विचारपूर्वक भाजपसह मित्र पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले.

उमरगा व लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजपसह मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.दोन) कोराळ (ता.उमरगा) येथे आयोजित सभेत श्री. बावणकुळे बोलत होते. माजी मंत्री तथा भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते शरण पाटील, संताजी चालुक्य, मदन पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, महमंदरफी तांबोळी, योगेश राठोड, शहाजी पाटील, मोहन पणूरे, सिध्देश्वर माने, कैलास शिंदे, आदींची उपस्थिती होती. श्री. बावणकुळे पुढे म्हणाले की, विकसित धाराशिव जिल्ह्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून एक लाख कोटी मिळणार आहेत. काँग्रेसने त्यांच्या सरकारच्या राज्यात लाडकी बहिण योजना बंद केल्या मात्र महाराष्ट्रात ही योजना अखंडपणे सुरू रहाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mahur Panchayat Samiti Third Prize for State-Level Best Taluka Award
Amravati News
Vidarbha News
“From Farming to Business: Inside the Rural Livestock Entrepreneurship Initiative”
Marathi News Esakal
www.esakal.com