Weather Impact Rabi Crops : बदलते वातावरण रब्बीच्या मुळावर; मराठवाड्यात पिकांवर कीड, रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता
Chh. Sambhajinagar Agriculture News : बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, मराठवाड्यात कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मागील पंधरवाड्यात थंडीने चांगलाच कहर केला होता. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा ८ अंशांवर घसरला होता, तर यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच छत्रपती संभाजीनगरचे तापमान १० ते ११ अंशांवर घसरले होते.