Chatrapati Sambhajinagar News : मराठा व कुणबी एकच त्यांचा इतर मागासवर्गी वर्गात सरसकट समावेश करावा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तीन दशकांपासून अनेक आंदोलन करण्यात येत आहेत. यात अनेक मराठा बांधव शहीद झाले. त्यात एक पिढीच बरबाद झाली आहे.
agitation
agitation sakal
Summary

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तीन दशकांपासून अनेक आंदोलन करण्यात येत आहेत. यात अनेक मराठा बांधव शहीद झाले. त्यात एक पिढीच बरबाद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तीन दशकांपासून अनेक आंदोलन करण्यात येत आहेत. यात अनेक मराठा बांधव शहीद झाले. त्यात एक पिढीच बरबाद झाली आहे. मराठा आणि कुणबी एकच असून त्यांचा इतर मागासवर्गात सरसकट समावेश करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौकात महाराष्ट्र दिनापासून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे, आता नाही तर कधीच नाही, म्हणून अशी भूमिका घेत इतर मागासवर्गात सरसकट समावेश होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही आंदोलन करते प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे पाटील व इतरांनी दिला आहे.

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सकल मराठा समाजातर्फे मराठा आणि कुणबीच्या आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाज व सर्व समविचारी मराठा संघटनातर्फे हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

मराठा समाज हा शतकानुशक्ती शेतीची मशागत कुणबी करून आपल्या उदरनिर्वाह करीत आहेत बोटावर मोजता येईल, इतक्याच मराठा समाजातील लोक जमीनदार आहेत आज 50 टक्के मराठा भूमी नसून मजूरी शेतमजुरीचे काम करत आहेत.

मराठा आणि कुणबी आणि कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचे अनेक पुरावे आम्ही सरकारला आजपर्यंत दिले आहेत खत्री आयोग बापट आयोग सराप आयोग भाटिया आयोग समिती मासेस आयोग गायकवाड आयोग या सर्वांच्या समोर तोंडी व लेखी स्वरूपात याची पुरावे सादर केले आहेत. तरीही समाजाच्या बाजूने कोणीही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. अशी खंतही ठिय्या आंदोलन करणाऱ्या व्यक्त केली. यामुळे आता नाही तर कधीच नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहेत आमची मागणी मान्य करा अन्यथा ओबीसीतील सरसकट जातीनिहाय जनगणना करावीत अशी मागणी ही करण्यात येत आहे.

मराठा हा शब्द जातिवाचक नसून तो समूहवाचक धर्म उपाधी वाचक आहेत जसे 1970 व 80 च्या दशकापर्यंत शाळेत सर्वांच्या नोंदी मराठा- तेली, मराठा- कुणबी, मराठा- माळी, मराठा- धनगर ,मराठा -न्हावी, मराठा- लोहार अशी असायची. सरकारने जात धर्मावर नव्हे तर त्यांच्या व्यवसायावरून ज्यांना त्यांना आरक्षण दिले गेले त्यामध्ये बहुसंख्य म्हणून काही प्रमाणात मराठ्यांना जमीनदार म्हणून डावलले गेले.

आजही मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील चार पाच जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात मराठा समाजाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा एकच असल्याचे ओबीसी व इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र देण्यात येते. त्याचा लाभही ते लोक घेत आहेत. याचा संदर्भ घेत तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एक जून 2004 रोजी अध्यादेश काढून मराठा कुणबी समक्ष असल्याचे शेतीच्या खासरा उतारा जन्म मृत्यू नोंदणीचे पुरावे सादर करून 83 वे ओबीसी प्रमाणपत्र दिले जाते, तेच प्रमाणपत्र उर्वरित सर्वांना त्वरित द्यावेत, आजही मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून करीत असल्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेऊन 14 नोव्हेंबर 1999 ला सरकारने न्यायमूर्ती श्यामसुंदर यांचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पाठवला होता. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी व इतर मागासवर्गात समावेशासाठी मुंबई मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला आपल्याकडे असणारी कागदपत्र पुरावे सादर करण्यासाठी बोलवण्यात आली होती. तेव्हा आम्ही स्वतः मुंबईत हजर होत राहून लेखी पुरावे सादर केले होते. असेही प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी सांगितले.

सरकारने सरसकट मराठा कुणबी कुणबी मराठा चा इतर मागास वर्गात सरसकट समावेश करावा व ओबीसीतील जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी ही करण्यात येत आहे.

या ठिय्या आंदोलनात सतीश वेताळ, रेखाताई वाहाटुळे, मच्छिंद्र बोर्डे, सुरेश गायकवाड, शैलेश भिसे, मनीषा मराठे, अजय गंडे, दिव्या पाटील, राजेश लांडगे, सुनील खरात, शुभम भराट, प्रसाद भागीते, राजू बराडे, शिरीष गायकवाड, कविता पाटील, कल्याण हारदे, विजय घोगरे, अवधूत शिंदे, विजय काकडे, विकी राजे, सुवर्णा मोहिते, संदीप जाधव, किरण काळे, समाधान येडे, विकास पाटील यांच्यासह असंख्य मराठा समाजातील कार्यकर्ते तरुण महिला यांनी यात सहभाग नोंदवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com