छत्रपती संभाजीनगर : शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान विभागात कॉपीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. यंदा दहावीच्या ३७, तर २१४ बारावीच्या विद्यार्थ्यांविरोधात कॉपीप्रकरणी गुन्हे नोंदवले. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपासून (ता. १८) विभागीय मंडळात सुरू झाली. तीन ते चार दिवस या विद्यार्थ्यांची सुनावणी असणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.