बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश । Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश

औरंगाबाद : बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांतील वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी वर्ग करण्यात आला होता. सोमवारी (ता.६) जिल्ह्यातील पाच जणांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी ५२ मोर्चे काढण्यात आले. यात आरक्षणासाठी ५०हून जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. यात जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश होता. यातील पाच जणांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार अंबादास दानवे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, सतीश वेताळ, किशोर चव्हाण, शिवानंद भानुसे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा: कोल्हापूर : उचंगी प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ : मुश्रीफ

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अभिजीत देशमुख, मनोज गायके, शिवानंद भानुसे, सुनील कोटकर,प्रदीप हारदे, विजय काकडे, रमेश गायकवाड,सखाराम काळे, रवींद्र काळे, अनिल बोरसे, बाळु औताडे, धनंजय पाटील, निलेश ढवळे, रेखा वाहटुळे, सुकन्या भोसले, मनिषा मराठे, अजय गंडे, निलेश ढवळे, रविंद्र वाहटुळे, योगेश केवारे, श्रीराम पवार उपस्थित होते.

यांना दिले मदतीचे धनादेश कौशल्या कारभारी शेळके, विजय चौक, गारखेडा परिसर, लंका केशव चौधरी, न्यू हनुमान नगर, गारखेडा, रुक्मीणीबाई जगन्नाथ सोनवणे, देवगाव रंगारी, ता. कन्नड, संगीता उमेश एंडाईत, चौधरी कॉलनी, चिकलठाणा, शिवाजी किशोर हारदे, रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद

"सरकारने आज मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या जिल्ह्यातील कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे धनादेश देत मदत दिली आहे. जाहिर झालेल्या मदत सर्वांना देण्यात यावीत. यात राहिलेल्यांनाही मदत मिळावीत. आर्थिक मदत दिली, आता नोकरीचे दिलेले आश्‍वासनही पूर्ण करावे." -विनोद पाटील, याचिकाकर्ते

"मराठा क्रांती आंदोलनातील बलिदान दिलेल्यांच्या वारसांना आज राज्य सरकारतर्फे दहा लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. ही मदत मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबादचे यश असले, तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तो पर्यंत आमचा लढा चालू राहिल."-मनोज गायके पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

Web Title: Checks Help Families The Victims Maratha Reservation Movement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maratha Reservation