Chh. Sambhaji Nagar : निवडणूक आली अन् पाणी पेटले जनता मात्र तहानलेलीच; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी

चंद्रकांत खैरे - भागवत कराड यांच्यात पुरवठ्यावरून वाक््युद्ध
water
water sakal

छत्रपती संभाजीनगर - शहरातील अनेक भागांत सध्या १० ते १२ दिवसाला पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला आहेत. त्यातच आता शिवसेना नेते (ठाकरे गट) चंद्रकांत खैरे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ‘‘आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. तोपर्यंत शहरातील पाणीप्रश्‍न मिटला नाही तर जनता मतदानावर बहिष्कार टाकू शकते’’, असा इशारा खैरे यांनी दिला. त्यावर डॉ. कराड म्हणाले, ‘‘आता त्यांच्याकडे मोर्चे काढण्याचेच काम आहे’’, असा चिमटा त्यांनी काढला.

शहरातील अनेक भागात सध्या दहा ते १२ दिवसाला पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून, आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. तोपर्यंत शहरातील पाणीप्रश्‍न मिटला नाही तर जनता मतदानावर बहिष्कार टाकू शकते, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला.

शहरासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून २७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाची शुक्रवारी (ता. २०) श्री. खैरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, जायकवाडी येथील जॅकवेलच्या कामाच्या पाहणीनंतर पत्रकारांसोबत बोलताना खैरे म्हणाले, की सध्या जे काही काम सुरू आहे ते न्यायालयाच्या दट्ट्यामुळे सुरू आहे.

water
Chh. Sambhaji Nagar : ‘ उपरवाला ’सब देख रहा है! जिल्ह्यातील ११३ गावांत दोन हजार ७८ सीसीटीव्ही

असे असले तरी पाणी योजना पूर्ण होण्यासाठी २०२६ उजाडू शकते. कंत्राटदारामार्फत न्यायालयाची दिशाभूल केली जात आहे. ५३ पैकी केवळ १८ जलकुंभाचे काम प्रगतिपथावर असून, योजनेच्या ठरवून दिलेल्या वेळापत्रकापेक्षा तीस टक्के काम मागे असल्याचा आरोप खैरे यांनी केला. दरम्यान, पाणी प्रश्नावर शिवसेना धडक मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांचे काम मोर्चे काढण्याचेच!

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करुन पाण्यासाठी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आता त्यांचे काम मोर्चे काढण्याचेच राहिल्याचा चिमटा काढला. विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी (ता.२०) आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांना विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. शहरवासीयांना पाणी देण्यासाठी जो विलंब झाला तो महाविकास आघाडीमुळेच झाला आहे.

water
Chh. Sambhaji Nagar : वर्षभरात घरे होणार डिजिटल! इंडसइंड बॅंकेतर्फे लागणार शहरात ॲड्रेस बोर्ड

डिसेंबर अखेरपर्यंत शहरवासियांना पिण्यासाठी पाणी देण्याच्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आता मोर्चे काढण्याचेच काम आहे. जानेवारी २०२४ पर्यंत जिथे मीटर बसवले आहेत तिथे स्वयंपाकाचा गॅस देण्याचा प्रयत्न असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com