Chh. Sambhaji Nagar : जमीन मोजणीसाठी मिळाल्या तीन रोव्हर मशिन; जमीन मोजणी होणार गतिमान

रोव्हर मशिन ही सॅटेलाइटच्या माध्यमातून चालणारे यंत्र आहे. यामुळे जमीन मोजणी अद्ययावतपणे होते.
Chh. Sambhaji Nagar
Chh. Sambhaji Nagar Sakal

पैठण - पैठण येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला जमीन मोजणीसाठी अत्याधुनिक तीन रोव्हर मशिन मिळाल्या आहे. यामुळे जमीन मोजणी अधिक गतिमान होणार असून कमी मनुष्यबळामुळे कमी वेळेत अन् अचूक जमीन मोजणी होण्यास मदत मिळेल.

Chh. Sambhaji Nagar
Chh. Sambhaji Nagar : जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिला राजीनामा

रोव्हर मशिन ही सॅटेलाइटच्या माध्यमातून चालणारे यंत्र आहे. यामुळे जमीन मोजणी अद्ययावतपणे होते. या यंत्राद्वारे जमिनीची अचूक मोजणी होऊन रियल को-ऑर्डिनेट मिळतात.

अशी ही रोव्हर तीन मशिनची यंत्रणा पैठण उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध झाली आहे. जमीन मोजणीसाठी अनेक अर्ज नियमित येतात.

परंतु कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित अर्जांची संख्या वाढतच होती. मात्र, आता तीन रोव्हर उपकरणामुळे कमी वेळेत आणि अचूक जमीन मोजणी होत आहे.

पैठण येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागाने या मशिनच्या मदतीने शेतजमिनीचे मोजमाप सुरू केले आहे. पूर्वी मोजमाप करताना मोठा अवधी लागत होता. आता या मशिनने अल्पावधीत अचूक मोजमाप करता येणार आहे.

जमिनीचे मोजमाप करण्यासाठी पूर्वी टेबल पद्धतीने मोजमाप करण्यात येत होते. यामुळे मोजणी करण्यासाठी प्रचंड वेळ लागत होता. रोव्हर मशिनमुळे सर्व मोजमाप लवकर होण्यास मदत होणार आहे.

Chh. Sambhaji Nagar
Mumbai Crime: धक्कादायक! दोन दिवसाच्या नवजात बाळाला रिक्षात सोडलं अन् अपहरणाचा केला बनाव कारण..

पूर्वी साखळी पद्धतीने मोजमाप होत होते. यात एका कडीचा जरी फरक पडला तरी फार मोठे अंतर वाढत होते. आता रोव्हर मशिनमुळे अचूक आणि झटपट मोजणी करणे शक्य होणार आहे. दरम्यान, भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे अनेक मोजणीची कामे प्रलंबित राहतात. आता रोव्हर मशिन आल्याने मोजणीच्या कामांना वेग आला आहे. अर्ज तत्काळ निकाली निघत आहेत.

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

पूर्वी जमिनीचे वाद असल्यास भूमी अभिलेखकडे मोजणीसाठी अर्ज येत होते. मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवायची. मात्र, आता शासनाने सॅटेलाइटद्वारे चालणारे रोव्हर यंत्र उपलब्ध करून दिले आहे.

त्यामुळे कमी कालावधीत अधिक जमिनीची मोजणी होत आहे. परिणामी, वादही मिटण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केल्यास तातडीने त्यावर निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Chh. Sambhaji Nagar
Mumbai Crime: धक्कादायक! दोन दिवसाच्या नवजात बाळाला रिक्षात सोडलं अन् अपहरणाचा केला बनाव कारण..

शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी शासनाकडून पैठण भूमी अभिलेख कार्यालयाला तीन रोव्हर मशिन मिळाले आहे. यामुळे जमिनीची अचूक मोजणी व जमीन मोजणीचे काम वेगाने होत आहे. रोव्हर मशिन सॅटेलाइटद्वारे चालत असून, त्याची अॅक्युरसी आधीच्या उपकरणापेक्षा अधिक चांगली आहे.

- रमाकांत डाहोरे, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय,ता.पैठण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com