Chh. Sambhaji Nagar : पाणीसंकटांची मालिका संपेना

शहराच्या दोन्ही पाणी पुरवठा योजनांचे आयुष्य संपल्याने वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - शहराच्या पाणी पुरवठ्यावरील संकटांची मालिका कायम आहे. रविवारी (ता. आठ) रात्री फारोळा येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात रात्री अचानक वीज गूल झाली. दीड तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला पण यामुळे महापालिकेचे पाणी उपशाचे पंप पूर्णपणे सुरू करण्यासाठी सुमारे तीन तासांचा वेळ गेला. त्यामुळे सोमवारी (ता. नऊ) शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे दोन ते तीन तास उशिराने सुरू झाले.

शहराच्या दोन्ही पाणी पुरवठा योजनांचे आयुष्य संपल्याने वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यात अधून-मधून विजेचा लपंडाव व पाइपलाइन फुटत असल्याने देखील पाणी पुरवठा विस्कळित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गणेशोत्सवाच्या काळात जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या.

त्यानंतर जायकवाडी पंपगृह व फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. या प्रकरणांमुळे आधीच शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झालेला आहे. त्यात रविवारी रात्री अकरा वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : दौलताबाद घाटात वाहतूक ठप्प; प्रवाशांना मनस्ताप, वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा

यामुळे जायकवाडी पंपगृहावरून नवीन व जुनी अशा दोन्ही योजना बंद पडल्या. रात्री ११.४० वाजता फारोळ्यात वीज खंडित झाला, तो सोमवारी पहाटे १.१० वाजता सुरळीत झाला. त्यानंतर एकएक पंप सुरु करण्यात वेळ गेला. शहरात पाणी येईपर्यंत तीन तासांचा वेळ लागला. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून सुरू झालेले पाणी वितरणाचे टप्पे दोन ते तीन तास उशिराने देण्यात आले

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : वाराणसीच्या धर्तीवर होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम विकसित

फारोळ्याची वीज गेली दीड तास अन् पुरवठा बंद तीन तास!

फारोळ्यात महावितरणकडून दीड तास वीज खंडित झाली होती. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर एकएक पंप सुरू करण्यात आला. यात एक ते दीड तासांचा वेळ गेला. त्यामुळे सुमारे तीन तास शहरात पाणी आले नाही, परिणामी पाणी पुरवठ्याचे टप्पे उशिराने लागले.

डी. के. पंडित, अभियंता, यांत्रिकी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com