chh. Sambhaji Nagar News : जोरदार पावसामुळे वळविली विमाने

शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - शहरात मंगळवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास चिकलठाणा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने दिल्लीचे विमान हैदराबादला आणि बंगळूरुचे विमान इंदूरला वळविण्यात आले.

शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर उशिरापर्यंत कायम होता. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे वातावरण बदलून गेले. त्याचवेळ

इंडिगो एअरलाइन्सचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर आणि बंगळूरु-छत्रपती संभाजीनगर हे विमान नियमित वेळेनुसार सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहराच्या आकाशात दाखल झाले. त्यावेळी शहरात धुवांधार पाऊस कोसळत होता.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : भरदिवसा लुटणारा चार तासांत जेरबंद ; वाळूजमध्ये खाम नदीकाठच्या मंदिर परिसरात प्रकार

पावसाचा जोर अधिक असल्याने दोन्ही विमानांना धावपट्टीवर उतरण्यासाठी पुरेशी दृश्यमानता मिळाली नाही. त्यामुळे दिल्लीचे विमान हैदराबादकडे आणि बंगळुरु विमान इंदूरकडे रवाना करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही विमानांनी दिल्ली आणि बंगळुरुला जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर ताटकळावे लागले.

sambhaji nagar
Solapur News : अमर बिराजदार यांनी बांधकाम क्षेत्रात ग्राहक अन् विक्रेत्याचा सांधला पूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com