Chh. Sambhajinagar Crime : मातेने केली चिमुकल्याची विक्री, दहा हजारात झाला व्यवहार; दुसऱ्या पतीसोबत केले पलायन
Child Sale : मुरूममध्ये एका आईने आपल्या एकवर्षीय चिमुकल्याची दहा हजारांत विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून बाळाची सुटका करून बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
मुरूम : पहिल्या पतीच्या निधनानंतर एक वर्षाच्या चिमुकल्यास चक्क दहा हजारांत विक्री केली, त्यानंतर तिने दुसऱ्या पतीसोबत पलायन केले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना उमरगा तालुक्यातील मुरूम येथे घडली.