
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाचा अतिरेक, चुकीची संगत आणि अमली पदार्थांचे सेवन यामुळे काही विद्यार्थी हळूहळू नशेच्या गर्तेत अडकत चालले आहेत. या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी ‘सकाळ’ आणि पोलिस दलाच्यावतीने ‘जागर अभियान’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरवात मंगळवारी (ता. पाच) सिडको परिसरातील बळिराम पाटील शाळेतून झाली.