
छत्रपती संभाजीनगर : अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांनी शहराला बकाल अवस्था आली आहे. आता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला असून, महापालिकेने अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी बेकायदा प्लॉटिंगला बळी पडू नये, यासाठी यंत्रणा विकसित केली जात आहे. महापालिकेच्या वेबसाइटवर एखादा भाग सर्च करताच ती जागा निवासी आहे, व्यावयासिक वापराची आहे की ग्रीन झोनमध्ये आहे, हे नागरिकांना कळणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. सात) सांगितले.