
छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेली ६८ वर्षांपासून सुरू होऊ न शकलेल्या रेस्पिरेटरी मेडिसिनच्या पदव्युत्तर पदवी (एमडी) अभ्यासक्रमाच्या पाच जागांना नुकतीच मान्यता मिळाली. पाचपैकी तीन जागा राज्य कोट्यातून दुसऱ्या फेरीच्या तात्पुरत्या सीट मॅट्रिक्समध्ये शुक्रवारी जाहीर झाल्या. तर, दोन जागा केंद्रीय कोट्यातून तिसऱ्या फेरीत जाहीर होणार आहेत.