

Free Electricity
sakal
छत्रपती संभाजीनगर : दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २५ वर्षे मोफत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेंतर्गत प्रत्येक घरावर एक किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.