
छत्रपती संभाजीनगर : शहरात कुठे स्त्रीभ्रूण हत्या, अवैधरीत्या गर्भलिंगनिदान होत असेल तर महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती कळवावी, तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, संबंधितावर आरोपपत्र दाखल झाले तर शासनाच्या खबरी बक्षीस योजनेअंतर्गत संबंधितांना एक लाखाचे बक्षीस मिळेल, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.