

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: वाढत्या उन्हाचा तडाखा केवळ माणसांनाच नाही, तर पक्ष्यांनाही बसत आहे. उष्माघात होऊन पक्षी रस्त्यावर पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरातील पक्षी वाचवण्यासाठी लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन’ आणि ‘देवगिरी महाविद्यालय’ (एनएसएस विभाग) यांच्या वतीने विशेष ‘पक्षी जलसंजीवनी’ अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांच्या मदतीने पक्ष्यांच्या दाना-पाण्याची सोय केली जात आहे.