जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन ;पालिका वॉर्ड कार्यालयातील नागरिकांच्या फेऱ्या टळणार

Chhatrapati Sambhajinagar, Birth Death Certificate, Online Application छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. .
online process for birth and death certificates.

online process for birth and death certificates.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात मारावे लागणारे फेरे आता थांबणार आहेत. प्रमाणपत्रांसाठी आता फक्त ऑनलाइन अर्ज घेण्यात यावेत, तसेच चुकून अर्ज दुसऱ्या वॉर्ड कार्यालयाकडे गेलेला असेल संबंधितांनी तो संबंधित वॉर्डाकडे वर्ग करण्याची सुविधा महापालिकेकडून नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. महिनोमहिने हे प्रमाणपत्र मिळत नाहीत. तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पुन्हा वॉर्ड कार्यालयात जाऊन झेरॉक्स द्यावे लागतात. हा प्रकार आयुक्त येडगे यांच्या शहरातील विविध प्रभाग कार्यालयांची पाहणी केल्यानंतर लक्षात आला

. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी दाखल केलेले अनेक अर्ज मोठ्या संख्येने प्रलंबित असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित अर्जांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात अमोल येडगे यांनी सांगितले, की भविष्यात प्रमाणपत्रासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठीही नियोजन केले आहे.

यासाठी नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करून संबंधित कागदपत्रे अपलोड केल्यास, त्यांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठविली जाते. या लिंकद्वारे त्यांनी शुल्क जमा केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली असल्यास नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. ऑनलाइन अर्ज केलेल्या नागरिकांकडून पुन्हा लेखी अर्ज व कागदपत्रांचे झेरॉक्स घेण्याची गरज नाही, असे आयुक्तांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांच्या फेरे वाचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com