

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात मतदार यादी विशेष पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन तथा एसआयआर) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बीएलओं’ना कामाला लावले होते.
परंतु, या प्रक्रियेत अंग झटकणाऱ्या जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीप स्वामी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.