

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: बसस्थानक परिसरात २०० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी झाली. ‘चलो सिल्लोडऽऽ चलो बुलडाणाऽऽ अशा आरोळ्या थांबल्या. पण, एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी मात्र थांबलेली नाही. दलालांनी आता नवी शक्कल लढवत बसस्थानकातच प्रवाशांना गाठून, ‘बाहेर कार उभी आहे; लगेच निघणार,’ असे सांगत त्यांना २०० मीटरच्या बाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनांपर्यंत नेण्याचा धंदा सुरूच ठेवला आहे.