

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शासनाचा एखादा निर्णय असो, की आपत्कालीन परिस्थिती, अशावेळी शहरात रिक्षाचालक संप करतात. मग त्या दिवशी प्रवाशांची प्रचंड आबाळ होते. महिला, मुले रस्त्यावर वाहनाच्या प्रतीक्षेत तास-तास उभे असल्याचे चित्र दिसते. त्यावेळी सर्वांनाच आठवण येते ती शहर बसची. तब्बल १७ लाख लोकसंख्या असलेल्या आणि रोज विस्तारणाऱ्या या शहराला सार्वजनिक वाहतुकीची किती गरज आहे, याची प्रचितीही त्यावेळी येते.