Bangalore Blasts: बंगळुरू बॉम्बस्फोटाचं छ. संभाजीनगर कनेक्शन; ‘NIA’कडून तिघांची चौकशी

Bangalore Blasts: बाँम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब यांच्यासोबत क्रिप्टोकरन्सी व्यवहार केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला. हे तिन्ही तरुण शिक्षण घेत आहेत.
Bangalore Blasts
Bangalore BlastsEsakal

छत्रपती संभाजीनगर: बंगळूरमधील रामेश्वरम कॅफे बाँबस्फोट प्रकरणाचे धागेदोरे शहरापर्यंत पोचले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाकडून येथील मयूर पार्कमधील तीन तरुणांची चौकशी करण्यात आली. बाँबस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब यांच्यासोबत क्रिप्टोकरन्सी व्यवहार केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला. हे तिन्ही तरुण शिक्षण घेत आहेत.

बंगळूर येथील रामेश्वर कॅफेमध्ये १ मार्चला बाँबस्फोट झाला होता. यामध्ये नऊ जण जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. सुरवातीला या प्रकरणात ‘पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी (पीएफआय) संबंधित एकाला अटक करण्यात आली होती; तसेच क्रिप्टो मार्गाने आलेले पैसे हे हल्ले करण्यासाठी आणि कूलिंग-ऑफ कालावधीत टिकून राहण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

Bangalore Blasts
रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवणारा 'तो' संशयित दहशतवादी किनारपट्टीचा रहिवासी; 'इसिस'कडून प्रशिक्षण, सिल्व्हर प्लास्टिक बॉम्बचा वापर

या प्रकरणाच्या अधिक चौकशीत एनआयएला छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची नावे समोर आली. त्यावरून एनआयएच्या पथकाने शहर गाठले. दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने त्यांनी मयूर पार्कमधील बंगळूर स्फोट प्रकरणाचे धागेदोरे संभाजीनगरात तीन तरुणांची चौकशी केली. एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यां‍नी मयूर पार्क परिसरातील तरुणांची त्यांच्या परिसरातच प्राथमिक चौकशी केली.

Bangalore Blasts
Bangalore Water Crisis : बंगळुरूमध्ये कार धुणे, झाडांना पाणी घालण्यावर बंदी! देशाच्या 'आयटी हब'मध्ये का होतेय पाणी टंचाई

त्यात संशयित दहशतवाद्यांना ओळखत नसल्याचे त्या तरुणांनी सांगितले. त्यानंतर अधिक तपासासाठी त्या तरुणांना एटीएसच्या कार्यालयात बोलावण्यात आले. दरम्यान, या तिन्ही मित्रांनी संशयित दहशतवाद्यांसोबत क्रिप्टो करन्सीचा व्यवहार केल्याचा दावा सूत्रांनी केला. चौकशी करण्यात आलेले तीनही तरुण २० ते २२ वर्षांचे आहेत. ते एकमेकांचे मित्र आहेत. त्यातील एकाने वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर पिंपरी चिंचवड येथील महाविद्यालयात शिक्षण सुरू केले. मात्र, पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर तो छत्रपती संभाजीनगरात परत आला. त्याने शिक्षण सोडल्याचा दावा करण्यात येत आहे.

Bangalore Blasts
Bangalore Bomb Blast : रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट; चार संशयित ताब्यात, महत्त्वाच्या ठिकाणी हाय अॅलर्ट, तपास CBI कडे

फरार दहशतवाद्यांवर दहा लाखांचे बक्षीस

तपास यंत्रणेने या प्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांची नावेही निष्पन्न केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब (रा. तीर्थहल्ल, जि. शिवमोग्गा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. या दोघांच्या मनी ट्रेलच्या चौकशीतील आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी ते क्रिप्टो करन्सीमध्ये व्यवहार करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com