Chh. Sambhajinagar Crime : बेगमपुऱ्यात मृतदेह, अंगावर जखमा; घातपात की आत्महत्या?

नात्यातील महिलेकडून घेतले होते व्याजाने पैसे
chhatrapati sambhajinagar crime found dead body police case marathi news
chhatrapati sambhajinagar crime found dead body police case marathi newsEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुऱ्यातील मकाई गेट पुलाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर विविध प्रकारच्या जखमा असल्याने घातपात की आत्महत्या, असा प्रश्न उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, मृत व्यक्तीने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी नात्यातील जवळच्या महिलेकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.

मागील काही दिवसांपासून संबंधित महिला त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होती. यादरम्यानच अचानक पैसे घेणारा व्यक्ती बेपत्ता झाला, त्याचा थेट मृतदेह आढळला, तर दुसरीकडे नात्यातील संबंधित महिलाही बेपत्ता झाली. त्यामुळे हा घातपात की आत्महत्या? यावर पोलिसांचा कस लागत आहे. जगदीश ज्योतिष फत्तेलष्कर (४०, रा. लालमंडी, बेगमपूरा) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी बेगमपुरा पोलिस आणि फत्तेलष्कर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ते आठ महिन्यांपूर्वी जगदीश यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी जवळच्या नात्यातील महिलेकडून एक लाख रुपये घेतले होते. मागील काही महिन्यांपासून महिलेने जगदीश यांना एका लाखांचे दहा लाख रुपयांची मागणी करत त्यांच्या घरात कब्जा केला होता.

पोलिसांनी घेतली नव्हती तक्रार

ज्या नातेवाईक महिलेकडून मृत जगदीश यांनी पैसे घेतले होते, त्या महिलेने जगदीश यांच्याविरोधात आठवडाभरात बेगमपुरा पोलिस ठाण्यात एनसी दाखल केली होती. मात्र, त्याच वेळेस पैशांसाठी होणारा त्रास आणि महिलेने घरात कब्जा मिळविल्याने जगदीश यांनीही तक्रार अर्ज दिला होता.

मात्र, त्यावर काहीच कारवाई न झाल्याचा आरोप जगदीश यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जगदीश हे हार्डवेअरच्या दुकानात काम करत होते. त्यांना दोन लहान मुले असून एक मुलगी आहे. त्यांचा भाऊ योगेश हे एका दुध डेअरीवर काम करतात. त्यांना दोन विवाहित बहिणी असून एक नांदेड तर दुसरी अकोला जिल्ह्यात दिलेली आहे.

हे प्रश्न अनुत्तरीतच

  • घराचा कब्जा केल्यानंतर घटना घडताच महिला गायब का झाली?

  • पुलावरुन उडी घेतल्यास मार लागू शकतो, पण अंगावर जखमा कशा?

जगदीश यांचा तक्रार अर्ज आलेला होता, त्यावर एनसी, किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. आणखी याची माहिती घेत आहे.

- आम्रपाली तायडे, पोलिस निरीक्षक, बेगमपुरा ठाणे

भल्या पहाटे नेले उचलून

मृत जगदीश यांच्या नातेवाईकांनी सांगितले, की १ नोव्हेंबररोजी पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान महिला कारने गुंड घेऊन आली, त्याला बुलेटवर दोघांनी उचलून नेले तर महिला कारमध्ये गेली. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास मृत जगदीश यांचा लहान भाऊ योगेश फत्तेलष्कर यांनाही बळजबरी नेत त्यांच्याकडून घर घेण्यासंदर्भातील बंधपत्रावर (बॉण्ड) स्वाक्षऱ्या घेतल्या.

त्याच दिवशी सायंकाळी साडेचारदरम्यान मृत जगदीश यांचा मृतदेह मकाई गेट परिसरातील साधारण ३० ते ३५ फूट उंचीच्या पुलाखाली सापडला. बेगमपुरा पोलिसांनी धाव घेत तत्काळ घाटीत दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.